महिला सबलीकरण व आत्मरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या निर्भय कन्या अभियान अंतर्गत शंकरराव भेलके महाविद्यालय येथे निर्भय कन्या अभियान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत अमृतेश्वर कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयातील २५ विद्यार्थ्यांनी, अनंतराव थोपटे महाविद्यालय भोर येथील २५ विद्यार्थ्यांनी तसेच महाविद्यालयातील ४० विद्यार्थीनींनी स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण घेतले . तसेच आत्मविश्वास वाढवण्यासाठी विविध मार्गदर्शन सत्रे घेण्यात आली.कार्यशाळेचे उद्घाटन प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ ॲड राजेंद्र गाडे पाटील व मा . श्री जितेन्द्र भगत कराटे प्रशिक्षक यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी महिलांच्या सशक्तीकरणाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “स्वसंरक्षण हा प्रत्येक मुलीचा मूलभूत हक्क असून, आत्मनिर्भरता आणि आत्मविश्वास हेच स्त्रीसुरक्षेचे खरे हत्यार आहेत.”या कार्यक्रमात श्री जितेन्द्र भगत यांनी विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाच्या तंत्रांची माहिती दिली तसेच कराटे प्रात्यक्षिकांचे आयोजन केले. उपस्थित विद्यार्थिनींनी या कार्यशाळेचा मोठ्या उत्साहाने लाभ घेतला आणि आपल्या सुरक्षिततेबाबत अधिक जागरूक होण्याची गरज व्यक्त केली.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ तुषार शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी विकास अधिकारी डॉ सचिन घाडगे यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांना महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि कार्यालयीन कर्मचारी यांनी सहकार्य केले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थिनींना यापुढेही अशा उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.
Discussion about this post