लोहा कंधार प्रतिनिधी.
लोहा कंधार दररोज चालणारा ऑटो रिक्षा आज लोह्याकडून कंधारकडे येणाऱ्या ऑटोरिक्षा चा संत नामदेव महाराज मंगल कार्यालय समोर रिक्षाचा ब्रेक फेल होऊन मोठा अपघात झाला. मात्र त्यात कोणतीही जीवित हानी झाली नाही . या रिक्षामध्ये सहा प्रवाशी व एक चिमुकला प्रवास करत होता, त्यातील पाठी मागे बसलेल्या प्रवाशांना काही प्रमाणात दुखापत झाली. तर रिक्षाचालकाच्या बाजूस बसून प्रवास करणारे तीन प्रवासी हे गंभीर जखमी झाले. ज्या ठिकाणी अपघात झाला तेथील नागरिकांनी त्यांना तातडीने कंधार येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले व त्यांचा उपचार डॉक्टर शहाजी कुरे हे करत आहेत पण त्यातील तीन जण जास्त गंभीर असल्याकारणाने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथील जिल्हा रुग्णालय येथे पाठवले आहे व त्यांचा त्या ठिकाणी उपचार सुरू आहे.
Discussion about this post