विलास लव्हाळे जिल्हा प्रतिनिधी यांच्याकडून साहित्यिकांनी कथा, कवींनी केल्या उत्कृष्ट कविता सादर
लोकमत न्यूज नेटवर्क
परसोडा : येथील जिल्हा परिषद प्रशालेत
मराठी राजभाषा दिनानिमित्त गुरुवारी मुख्याध्यापक विकास तावरे व सदाशिव कांबळे यांच्या मार्गदर्शनासाठी आयोजित शालेय साहित्य संमेलनात साहित्यिकांनी कथा तर कवींनी उत्कृष्ट कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
सकाळी या साहित्य संमेलनाचे उद्घाटन् सरपंच राजू छानवाल, तंटामुक्ती गाव समितीचे अध्यक्ष सुदामसिंग छानवाल, केंद्रप्रमुख श्याम राजपूत, शालेय समितीचे अध्यक्ष कैलास डिके यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले. या संमेलनात प्रा. नामदेव निकम आणि वैशाली साबदे यांनी ग्रामीण
बोलीभाषेत कथा सादर केल्या. तर दुसऱ्या सत्रात बाल साहित्यिक धोंडीरामसिंग राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमलेन चांगलेच रंगले. यावेळी संतोष आळंजकर, बाबा चन्ने, जनार्दन राऊत, संजय जाधव, सुरेश राऊत, सदाशिव कांबळे, मच्छिंद्र बडोगे, मनीषा महेर, वैष्णवी मनाळ, कावेरी बोरकर यांनी आपल्या उत्कृष्ट कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी बाबासाहेब चन्ने आणि राजपूत यांनी शाळेला काही पुस्तक भेट दिली. कार्यक्रमास भाजपाचे तालुकाध्यक्ष नारायण कवडे, रमेश महेर, काकासाहेब कवडे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मीकांत धाडबळे यांनी तर आभार प्रदर्शन सदाशिव कांबळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विश्वास शेळके, मंजूषा तळेकर, शुभांगी साळवे, श्रीधर कदम यांनी परिश्रम घेतले.
The Review
विलास लव्हाळे जिल्हा प्रतिनिधी यांच्याकडून साहित्यिकांनी कथा, कवींनी केल्या उत्कृष्ट कविता सादर लोकमत न्यूज नेटवर्क परसोडा : येथील जिल्हा परिषद प्रशालेत मराठी राजभाषा दिनानिमित्त गुरुवारी मुख्याध्यापक विकास तावरे व सदाशिव कांबळे यांच्या मार्गदर्शनासाठी आयोजित शालेय साहित्य संमेलनात साहित्यिकांनी कथा तर कवींनी उत्कृष्ट कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. सकाळी या साहित्य संमेलनाचे उद्घाटन् सरपंच राजू छानवाल, तंटामुक्ती गाव समितीचे अध्यक्ष सुदामसिंग छानवाल, केंद्रप्रमुख श्याम राजपूत, शालेय समितीचे अध्यक्ष कैलास डिके यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले. या संमेलनात प्रा. नामदेव निकम आणि वैशाली साबदे यांनी ग्रामीण बोलीभाषेत कथा सादर केल्या. तर दुसऱ्या सत्रात बाल साहित्यिक धोंडीरामसिंग राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमलेन चांगलेच रंगले. यावेळी संतोष आळंजकर, बाबा चन्ने, जनार्दन राऊत, संजय जाधव, सुरेश राऊत, सदाशिव कांबळे, मच्छिंद्र बडोगे, मनीषा महेर, वैष्णवी मनाळ, कावेरी बोरकर यांनी आपल्या उत्कृष्ट कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी बाबासाहेब चन्ने आणि राजपूत यांनी शाळेला काही पुस्तक भेट दिली. कार्यक्रमास भाजपाचे तालुकाध्यक्ष नारायण कवडे, रमेश महेर, काकासाहेब कवडे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मीकांत धाडबळे यांनी तर आभार प्रदर्शन सदाशिव कांबळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विश्वास शेळके, मंजूषा तळेकर, शुभांगी साळवे, श्रीधर कदम यांनी परिश्रम घेतले.
Discussion about this post