राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम मोहिम 2.0 अंतर्गत0 ते 18 वर्ष वयातील मुला-मुलींची सर्वांगीण विनामूल्य आरोग्य तपासणी होणार निरोगी बालपण हे सुरक्षित भविष्य निर्माण करेल.
आजरा: तालुका प्रतिनिधी,
आजरा, दि. १ (प्रतिनिधी) : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम मोहिमेची
जिल्ह्यात सुरुवात झाली असून 0 ते 18 वर्ष वयातील मुला-मुलींची सर्वांगीण विनामूल्य आरोग्य तपासणी होणार आहे. निरोगी बालपण हे सुरक्षित भविष्य निर्माण करेल याचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ अमोल पाटील यांनी केले.
आजरा हायस्कूल, उर्दू हायस्कूल व स्वामी विवेकानंद विद्यामंदिर येथे तालुकास्तरीय राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम मोहिमेचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने झाले. या अभियानामध्ये मुलांमधील दोष, आजारपण लवकर शोधणे व वेळीच उपचार करुन भविष्यात आरोग्य विषयक उद्भवणारे दोष कमी करणे आणि भविष्यकाळात देशाची आर्थिक व सामाजिक उन्नती साधने हा उद्देश असल्याचे सांगितले.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य अंतर्गत राज्यातील 0 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांची होणार सर्वांगीण तपासणी या उपक्रमांतर्गत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय मोहिमेचे उद्घाटन कार्यक्रमाचे पुणे येथून थेट प्रक्षेपण दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थितांना दाखविण्यात आले.
डॉ अनिल देशपांडे व डॉ दीपक सातोस्कर यांनी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत लहान मुला-मुलींना, सेवकांना देण्यात येत असलेल्या आरोग्य सुविधेबद्दल यावेळी आभार मानले.
यावेळी रुग्णकल्याण समिती चे मा विजय थोरवत, माजी नगराध्यक्षा सौ ज्योत्स्ना चराटी ,
तालुका आरोग्य अधिकारी डॉ ठाकूर, राष्ट्रीय बाल स्वास्थ वैद्यकीय अधीकारी डॉ. दरवाजकर, डॉ स्वाती रेडेकर डॉ सातवेकर, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन युनुस लाडजी सर व आभार प्रदर्शन वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरजीत पांडव यांनी केले.
Discussion about this post