भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांच्या नेतृत्वात निवेदन सादर
प्रतिनिधी:- नितेश केराम
कोरपना नारंडा भोयगाव चंद्रपूर बस सेवा सुरु करण्या संदर्भात राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे राजुरा आगार प्रमुख यांना निवेदन दिले
सदर बस सेवा सुरु झाल्यास कोरपना तालुक्यातील कोडशी बु कोडशी खुर्द गांधीनगर हेटी शेरज बु शेरज खुर्द माथा लोणी पिपरी नारंडा वानोजा कढोली खुर्द अंतरगाव सांगोडा हिरापूर वीरूर गाडेगाव बोरगाव इरई भरोसा भोयगाव इत्यादी गावातील नागरिकांना फायदा होईल
कोरपना नारंडा भोयगाव चंद्रपूर बससेवा सुरु झाल्यास कोरपना तालुक्यातील नागरिकांना चंद्रपूरला जाण्यासाठी सोपा व सोयीचा होईल सदर मार्गांवर कोरोना पासून एकही बससेवा सुरु नव्हती त्यामुळे जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी नागरिकांना राजुरा मार्गे फेरा घेऊन जावे लागत आहे त्यामुळे नागरिकांचा वेळ व खर्च वाया जात होता सदर बससेवा सुरु व्हावी अशी परिसरातील नागरिकांची गेल्या अनेक वर्षा पासून मागणी होत होती.
सदर मागणीची दखल घेत चंद्रपूर वरून नारंडा मार्गे कोरपनासाठी सकाळी 8:30 वाजता व सायंकाळी 5:00 वाजता व कोरपना वरून नारंडा मार्गे सकाळी 10:30 वाजता बससेवा सुरु करण्या संदर्भात भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे आगर प्रमुख यांना निवेदन देऊन सदर बससेवा सुरु करण्या संदर्भात निवेदन देऊन मागणी केली आपण लवकरात लवकर सदर बससेवा सुरु करण्या संदर्भात कार्यवाही करू अशी आश्वासन राजुरा आगार प्रमुख यांच्या मार्फत देण्यात आले
Discussion about this post