कागल
बेलेवाडी काळम्मा,तालुका कागल
आज कागल तालुक्यातील बेलेवाडी काळम्मा सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना कार्यस्थळावर नामदार हसन मुश्रीफ साहेब यांची महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा आमदार पदी सलग सहाव्यांदा आमदार निवड व महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीमंडळ मधे वैद्यकीय शिक्षणमंत्री पदी निवड झाली त्यानिमित्ताने कारखाना कार्यस्थळावर सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना येतील साखर कामगार संघटना,कारखाना प्रशासन यांच्या वतीने स्तकार सोहळा आयोजित करण्यात आला होता.यावेळी साखर कामगार संघटना व प्रशासन यांनी कारखाना कार्यस्थळावर नामदार हसन मुश्रीफ यांची रथातून मिरवणूक काढण्यात आली
तसेच जेसीबितून फुलांची उधळण करण्यात आली,यावेळी शरद सहकारी साखर कारखाना कामगार संघटना चे अध्यक्ष,बबन भंडारी,शुगर फेडरेशन चे खजिनदार श्री. उदय भंडारीसाहेब,अनिल भंडारी, संपत चव्हाण ,कोल्हापूर जिल्हा साखर कामगार संघटना अध्यक्ष कॉमरेड मा.सुभाष गुरव साहेब,जनरल सेक्रेटरी साखर कामगार संघटना,शामराव मोरे साहेब,दिगंबर खाडे,सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना कामगार संघटना आध्यक्ष मोहन पाटील,उपाध्यक्ष काशिनाथ घोडके,यांची मनोगत व्यक्त करण्यात आली ,नामदार हसन मुश्रीफ साहेबांचा सत्कार साखर कामगार संघटना व प्रशासन यांच्या प्रतिनिधी यांच्याकडून शाल ,पुष्पगुच्छ,देवून सत्कार करण्यात आला,तसेच शरद सहकारी साखर कारखाना,नरंदे साखर कामगार संघटना अध्यक्ष बबन भंडारी,उपाधक्ष्य अनिल भंडारी,फेडरेशन खजिनदार उदय भंडारी,खाडे यांच्या हस्ते नामदार हसन मुश्रीफ यांना शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.या सत्कार प्रसंगी नामदार हसन मुश्रीफ साहेबांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यांनी यावेळी या सत्कार समारंभप्रसंगी आदर व्यक्त केला आणि आभार मानले
या वेळी नामदार हसन मुश्रीफ साहेबांनी संताजी घोरपडे साखर कारखाना कामगारांना वेतन मंडळ प्रमाने सेवा शर्थी लागू केल्याचे जाहीर केले

Discussion about this post