
वडवणी प्रतिनिधी :- प्रकाश शेंडगे.
धारूर तालुक्यातील तेलगाव येथील बालाघाट पब्लिक स्कूल मध्ये 28/02/2025रोजी वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहमध्ये संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ऍडवोकेट माझी न्यायाधिश बाबुरावजी रामभाऊ तिडके, उदघाटक म्हणून तेलगाव येथील सरपंच बाबुरावजी धुमाळ तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख आपेट सर, सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे पर्येंवेक्षक चवार सर, उत्तमलालजी तोष्णीवाल, प्रेमलता उत्तमलालजी तोष्णीवाल, (माझी नगर अध्यक्ष धारूर) ह.भ.प. स्वाती ताई मस्के,ग्रामीण कवी प्रकाश शेंडगे,प्रगतशील शेतकरी माऊली आगे,बाबुरावजी मुळे, वसंत दादा सावंत,संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांतजी तोष्णीवाल,प्रियेंका प्रशांत तोष्णीवाल,उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी खूप सुंदर नियोजन केले होते..
Discussion about this post