

भराडी, शाळेमध्ये सर्वांगीण शिक्षण असावं, नेहमी लिखाण वाचन , खेळ यासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन असेल तर विद्यार्थी शाळेत रमण्यास मदत होते. व कलागुणांना वाव मिळतो असे प्रतिपादन पोलिस निरीक्षक शेषराव यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गायरानवाडी, मोढा बु. शाळेत वार्षिक स्नेहसंमेलनात केले.
यावेळी
सरपंच वर्षाताई हावळे, अतुलराव कुळकर्णी ,कैलास ढोरमारे , राजू महाजन, दिलीप सुंसुंद्रे, सज्जनराव टाकसाळे, छायाताई टाकसाळे, सुनील हिवाळे,राधाकृष्ण काकडे , संभाजी हावळे, अशोकराव सुरडकर, देविदास सुरडकर, कृष्णा ढोरमारे,विठ्ठलराव ढोरमारे, नामदेवराव जाधव, महेंद्र कुलकर्णी, साईनाथ फुसे, रविंद्र खांडवे, अण्णा हावळे, संजय शेजुळ, धनंजय काटे, विजय काकडे, साहेबराव काळे, दिपक पंडित भिकन सोनवणे, नारायण काकडे,बाळू शिंदे , गोपाल ढगे, समाधान गाडे, अंकुश महाकाळ, संजय काकडे, संतोष दाभाडे यांची उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांनी गणेश वंदना, स्वागत गीत, देशभक्तीपर, गौळण,लावणी, प्रबोधनपर नाटिका, महापुरुषांना वंदन गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
4 वर्षे वयाच्या शंभु समाधान गाडे या बालकांने शिवगीत तसेच वडिलांविषयी गीत ऐकून सर्वांना मंत्रमुग्ध केले.विद्यार्थांच्या कलागुण पाहून उपस्थितांनी बक्षिसांचा वर्षाव केला.सरपंच वर्षाताई हावळे यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट दिले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक दत्तू हावळे ,सूत्रसंचलन सहशिक्षिका श्रीम. योगिता निकम तर आभार अश्विनी भांबिरे यांनी केले..
Discussion about this post