
उदगीर /कमलाकर मुळे :
जनसेवेसाठी आमदारकी आणि मंत्रीपदाचा कधीही गर्व केला नाही. सन 2014 पासून मतदार संघातील जनतेच्या सेवेत अविरतपणे कामे केली.त्यामुळेच मागील 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत मला पहिल्यांदा आमदार होण्याची संधी आपण सर्वांनी दिली. व आपल्या मताचा आदर करून पक्षश्रेष्ठीनी मंत्री पदाची जबाबदारी दिल्याने मागील पाच वर्षाच्या कार्यकाळात 6000 कोटी पेक्षा जास्त विकास निधी खेचून आणला. आपल्या भागाचा विकास केला आणि हे सर्व करत असताना आपला लोकसेवक म्हणून काम केले. असे विचार माजी क्रीडामंत्री आ. संजय बनसोडे यांनी व्यक्त केले. उदगीर तालुक्यातील हेर ग्रामस्थांच्या वतीने आयोजित भव्य नागरी सत्कार सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार गोविंद केंद्रे ,रामचंद्र तिरुके, बाबासाहेब पाटील, भागवत गुरमे ,बालाजी भोसले ,वसंत पाटील , रजनीत रासुरे, हनुमंतराव हंडरगुळे, लक्ष्मण जाधव, लक्ष्मण गुराळे ,बालाजी पुरी, अनंत पाटील, धनाजी माटेकर गणपती मुंडे, सुदर्शन मुंडे, मारुतीराव घोणशे, विलास कांबळे मारुतीराव घोणसे, सुधाकर बिरादार, केशव कांबळे, भगवंत मिटकरी, दत्ता बुरले, गंगाधर स्वामी, गुरुपतप्पा मळभागे,रवी रासुरे ,सोयराबाई कांबळे, माधव मिटकरी ,तानाजी मुंडे हे उपस्थित होते..
Discussion about this post