
उदगीर /कमलाकर मुळे :
महिला व बाल विकासप विभागाअंतर्गत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर गठीत केलेल्या विविध समित्याचे एकत्रिकरण करून एकच जिल्हास्तरीय नियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. महिलांच्या संरक्षणासाठी हुंडा निर्मूलन कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण, देवदासी प्रथा निर्मूलन, अनैतिक देह, व्यापार प्रतिबंध, यासारख्या सामाजिक कायद्याच्या आणि महिला धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणी करिता, तसेच महिलांच्या विकासाकरिता विविध योजना राबविण्याच्या उद्देशाने अमलबजावणीच्या अनुषंगाने जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे .त्या समितीच्या सदस्य पदी प्रहारच्या जिल्हाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्त्या प्रेमलता हनुमंत भंडे यांची निवड झाली आहे..
Discussion about this post