
प्रविण इंगळे — उमरखेड तालुका प्रतिनिधी मो. 7798767266
उमरखेड :– भारतरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शांतता कमिटी मीटिंग चे आयोजन सम्यक बुद्ध विहार डॉ. बाबासाहेब आंबेडकर वॉर्ड उमरखेड येथे करण्यात आलेले होते.
यावेळी उमरखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार मा.शंकर पांचाळ साहेब यांनी आगामी सण उत्सव संदर्भातआणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आनंदमय आणि उत्साह वातावरणामध्ये कशी संपन्न होईल त्यावेळी मार्गदर्शन केले.
पारंपारिक वाद्यांना स्वीकारून डीजे मुक्त जयंती साजरी करावी तसेच जयंती मिरवणुकीमध्ये कुणीही दारू पिऊ नये असे आव्हान यावेळी करण्यात आले. तसेच डीजे वरील होणारा खर्च हाय एखाद्या उच्चशिक्षित विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी लावावा.
असेही मत ठाणेदार पंचायत साहेब यांनी व्यक्त केले. या शांतता कमिटी मिटींगचे प्रस्ताविक पत्रकार सिद्धार्थ दिवेकर यांनी केले.
तर आभार प्रदर्शन प्रफुल दिवेकर ,शहराध्यक्ष आझाद समाज पार्टीचे यांनी मानले त्यावेळी उपस्थित उमरखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी मा. शंकर पांचाळ साहेब व संतोष राठोड साहेब, माझी नगरसेविका हिराबाई दिवेकर, पत्रकार सिद्धार्थ दिवेकर, शहराध्यक्ष भीम टायगर सेना, प्रफुल दिवेकर, संतोष इंगोले,मनोज इंगोले, प्रसेनजीत दिवेकर, आकाश श्रवले आकाश पाईकराव, योगेश दिवेकर, अमोल दिवेकर, रमा माता महिला मंडळ अध्यक्ष उषाताई इंगोले, जनकाबाई इंगोले, जिजाबाई दिवेकर, भारतीताई केंद्रेकर, संगीता केंद्रे कर, मधुताई दिवेकर, कांचन दिवेकर, उज्वला धबाले, बेबाबाई गर्वदे, विद्याताई इंगोले, सुनिता दिवेकर यांच्यासह रमामाता महिला मंडळ तरुण मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते..
Discussion about this post