

लाडजळगाव प्रतिनिधी :
फुलसांगवी कडून केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याकडे ऊस घेऊन निघालेला ट्रॅक्टर दिवटे गावातील आनंदवाडी तांडा येथे सेवालाल महाराज चौकात ट्रॉलीचा खोबळा तुटल्यामुळे अचानक पलटी झाला. यामुळे सबंध ऊस रस्त्यावर विखुरला गेला. यामुळे अर्धा तास वाहतूक खोळंबली. ही घटना सोमवारी सकाळी साडेसात च्या सुमारास घडली.
मिळालेली अधिक माहिती अशी की, फुलसांगवी गावातून ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर हा केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याकडे निघाला होता. दिवटे गावातून जाताना आनंदवाडी तांडा येथे सेवालाल महाराज चौक पार करीत असताना ट्रॉलीचा खोबळा तुटल्यामुळे अचानक तो पालथा झाला. यामुळे पूर्ण रस्त्यावर ऊस विखुरला जाऊन शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही..
Discussion about this post