
प्रविण इंगळे — उमरखेड तालुका प्रतिनिधी मो. 7798767266
उमरखेड :– भारतीय संविधानाचे महत्व बालपणापासून अंगिकारून भावी पिढी एक सुजान नागरिक बनावी यासाठी गुलाम नबी आझाद समाजकार्य महाविद्यालय पुसद यांच्या माध्यमातून डॉ.भालचंद्र देशमुख यांच्या समन्वय व मार्गदर्शनात उमरखेड तालुक्यातील शाळांमध्ये संविधान गौरव महोत्सव अभियान राबविण्यात आले.
उमरखेड तालुक्यासाठी या अभियानाची जबाबदारी अत्तदिप धुळे यांनी सांभाळून जिला परिषद शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्व पटवून दिले. सर्वप्रथम प्रस्तावनेचे वाचन करण्यात आले. प्रस्तावनाचे वाचन झाल्याच्या नंतर त्याच्यातील महत्त्वपूर्ण शब्द जसे की स्वतंत्र, समता, बंधुता, न्याय धर्मनिरपेक्षता, एकता व एकात्मता यांचे अर्थ सांगून त्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
. विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाची रचना आणि महत्त्व स्पष्ट करण्यात आले. संविधानाची रचना, त्याचे उद्देश, आणि मुख्य घटक यांबद्दल माहिती दिली.
संविधानाचे ऐतिहासिक महत्त्व आणि त्याचा समाजावर असलेला प्रभाव सांगितला. तसेच विद्यार्थ्यांना संविधानाची काही महत्त्वपूर्ण कलमे वाचून समजावून दिली. विद्यार्थ्यांनी लघुनाटिका व चर्चासत्रात हिरारीने भाग घेउन संविधाना विषयी विचारांची देवाण घेवाण केली.
संविधान कशा पद्धतीने तयार झाले आणि त्यासाठी बाबासाहेबांनी घेतलेले कष्ट त्यातून मिळालेले आपल्याला अधिकार व हक्क याविषयी विद्यार्थ्यांनी आपले मत व्यक्त केले. संविधानातील प्रस्तावने प्रमाणे ती प्रस्तावना अंगिकारून भविष्यात आम्ही भारताचे सुजान नागरिक बनू अशी प्रतिज्ञा घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली..
Discussion about this post