
प्रा.दिलीप नाईकवाड सिंदखेडराजा : तालुका प्रतिनिधी..
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात तहसीलदार संतोष काकडे यांच्या जिवंत सातबारा मोहीम ची दखल जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी घेतली असून संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातच हा मोहीम राबविण्याचे निर्देश देऊन तशा प्रकारचे परिपत्रक काढण्यात आले असून जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील तहसीलदारांनी कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याची निर्देशही दिले आहे.
महसूल विभागाच्या 100 दिवसाच्या कृती आराखड्या अंतर्गत 1 मार्च 2025 पासून जिल्ह्यातील सर्व गावात या मोहिमे अंतर्गत सातबारा वरील मयत खातेदाराच्यां वारसदाराच्या नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे. खातेदारांच्या वारसांना जमिनीच्या अनुषंगाने दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्ये वारसाची नोंद विहित कालावधीत केली जाणार आहे. जिल्ह्यातच काय संपूर्ण महाराष्ट्रात मयत झालेल्या खातेदारांच्या वारसांना वारसदार लावून नोंद घेण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर मानसिक त्रास सहन करावा लागतो. शिवाय अंनत अडचणीचां सामना करावा लागतो . ती एक कागदोपत्री तांत्रिक कीचकट प्रकिया होती. पटवारी कार्यालय, तहसील कार्यालय , यात खेटे घालावे लागत होते व त्यानंतरही सातबारावर वारसांची नोंद होईलच याची खात्री वारसदारांना नव्हती. यामुळे सुद्धा जिल्ह्यातील सर्वच गावात कमी अधिक प्रमाणात वारसदारांसमोर अडचणी होत्या. नोंद नसल्यामुळे कोणत्याही बँकेत कृषी कर्ज प्रकरण होत नव्हते,
जिल्हाधिकारी यांच्या 100 दिवसाच्या कृती आराखड्याची अंमलबजावणी होत असल्यामुळे फार मोठा प्रश्न मार्गी लागणार आहे.
ई-हक्क प्रणालीद्वारे अर्ज प्रक्रिया अर्ज प्रक्रिया सरळ, सोपी, सुलभ, आणि पारदर्शी होण्यासाठी ई-हक्क प्रणालीचा वापर करण्यात येणार असून यासाठी प्रत्येक तालुक्यातील तहसीलदार यांच्यावर नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात ही मोहीम कालबद्ध वेळेतच पूर्ण करून घ्यावयाची आहे असे निर्देश त्यांना देण्यात आले असून वारसांना सुद्धा सातबारा नोंदी करून घेण्यासाठी ही फार मोठी संधी मिळालेली आहे 1ते 31 मार्च पर्यंत कालबद्ध कालावधीत हा कार्यक्रम जिल्हास्तरावर राबविल्या जात आहे .
कालाबद्ध कार्यक्रमानुसार प्रक्रिया
1) दिनांक 1ते 5 मार्च पर्यंत ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांनी आपल्या सज्जातील मयत खातेदारांची यादी तयार करणे.
2) 6 ते 15 मार्च या कालावधीत वारसासबंधी आवश्यक कागदपत्रे महसूल अधिकारी (तलाठी) यांच्याकडे सादर करणे.
3) ग्राम महसूल अधिकारी तलाठी यांनी स्थानिक चौकशी करून मंडळ अधिकारी यांच्या मार्फत वारसा ठराव मंजूर करुन घेणे.
4) दिनांक 16 ते 31 मार्च दरम्यान महसूल अधिकारी (तलाठी) यांनी वारस फेरफार तयार करून घेणे व मंजूर करणे.
अर्ज करण्याची आवाहन ही विशेष मोहीम वारसांना शेत जमिनीशी संबंधित हक्क मिळवण्यासाठी सहकार्य करणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची नोंद अद्याप पर्यंत सातबारावर झाली नाही त्यांनी या विशेष मोहिमेचा लाभ घेऊन दिलेल्या कालबद्ध कार्यक्रमासाठी अर्ज करून सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
यासाठी वारसदारांना खातेदाराचा मूळ किंवा प्रमाणित मृत्युपत्र दाखला, सर्व वारसांच्या वयाची साक्षांकित प्रमाणित प्रत, सर्व वारसांच्या आधार कार्डची प्रमाणित प्रत, वारसा बाबत विहीत नमुन्यातील शपथपत्र , अर्जातील सर्व वारसांचा पत्ता, भ्रमणध्वनी यांचा पुरावासह तपशील आवश्यक आहे..
Discussion about this post