

सिल्लोड :
देशभरात २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.२८ फेब्रुवारी १९२८ रोजी भारतीय भौतिकशास्त्रज्ञ, सर चंद्रशेखर वेंकट रामन यांनी रामन परिणामाचा (Raman Effect)शोध लावला. यासाठी त्यांना १९३०मध्ये नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले. तेव्हापासून २८ फेब्रुवारी हा दिवस भारतामध्ये ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ म्हणून साजरा केला जातो. भारतात शास्त्रीय, शैक्षणिक, वैद्यकीय, तांत्रिक, संशोधन आणि सर्व महाविद्यालये, विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, शास्त्रज्ञ, संशोधक हा दिवस खूप उत्साहाने साजरा करतात. भारतीयांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोण रुजला जावा हे याचं उद्दिष्ट आहे.विज्ञानात रुची वाढवण्यासाठी आणि समाजात विज्ञानाविषयी जागरूकता निर्माण व्हावी यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. याचाच एक भाग म्हणून सिल्लोड तालुक्यातील भराडी शाळेतील
ज्ञानविकास विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्याचा घाटातील अपघात टाळण्यासाठी अनोखा प्रयोगाने राज्यस्तरावर नोंद केली आहे. प्रामुख्याने तीन विद्यार्थीने सहभाग नोंदवला आहे. सागर काकासाहेब महाकाळ,सोहम गणेश शिंदे,यश संजयकर
सागर काकासाहेब महाकाळ हा मोढा बुद्रुक या गावांमध्ये वास्तव्यास होता . गावापासून दूर भराडी येथे ज्ञानविकास प्राथमिक शाळा भराडी या ठिकाणी तो शाळेत जात असे.
पंचायत समिती यांच्याकडून शाळेसाठी एक पत्र आले होते त्या पत्रामध्ये विज्ञान प्रदर्शन घेण्याबद्दल हे पत्र होतं. आणि त्या उद्देशाने सर्व विद्यार्थ्यांना सूचना करण्यात आली होती. येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्या शाळेमध्ये आपण विज्ञान प्रदर्शन घेणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांचा क्रमांक येईल त्या विद्यार्थ्याला आपण सिल्लोड येथे ५१ व्या विज्ञान प्रदर्शनासाठी पाठवणार आहोत, तोच संदेश गृहीत धरून सागर हा त्या प्रयोगाच्या कामाला लागला. आणि तो डोंगराळ भागात राहत असल्यामुळे त्याला एक कल्पना सुचली. घाटांमध्ये जे अपघात होतात ते आपण कशा पद्धतीने टाळू शकतो.सागर कामाला लागला पण त्याला काही अडचणी यायला लागल्या त्याला हात नसल्यामुळे तो हा प्रयोग स्वतः बनवू शकत नव्हता पण तो थांबला नाही. आपल्या आपल्या जवळच्या मित्रांची मदत घेऊन त्यांनी या प्रयोगाला सुरुवात केली. की घाटांमध्ये जास्त जास्त अपघात गाडी न दिसल्यामुळे त्या ठिकाणी होतात. अशा घाटांमध्ये त्यांनी सेंसर चा वापर करून आपण येणाऱ्या गाडीला त्या ठिकाणी सूचना करू शकतो की समोरून गाडी येते त्यामुळे दोन्ही गाड्यांची स्पीड कमी होऊ शकते. अपघात त्या ठिकाणी टळू शकतो आणि या प्रयोग मध्ये खास गोष्ट म्हणजे त्याने त्या गाडीला एक सेंसर बसवलेलं होतं. ते सेन्सर जर त्या ठिकाणी कोणत्याही ठिकाणी आदळ तर त्या ठिकाणी जवळच्या ॲम्बुलन्सला त्या ठिकाणी मेसेज जाऊ शकतो. घाटांच्या बाजूला त्यांनी हॉस्पिटलची उभारणी केली होती. जास्त अपघात हे घाटांमध्ये होतात त्यामुळे प्राण वाचवण्याकरता हॉस्पिटलचे उभारणी केली होती. आणि या प्रयोगा मुळे त्याचा तालुकास्तरावर प्रथम क्रमांक आला.हा प्रयोग जिल्हास्तरावर जाण्याकरता निवड झाली. जिल्हास्तरावर सुद्धा या प्रयोगाचा प्रथम क्रमांक येऊन राज्यस्तरावरनोंद झाली. सदरील प्रयोगाला त्याला एक हजार एवढा खर्च आला. एकूण प्रयोग बनवण्याकरता त्याला सात ते आठ दिवस लागले होते. या यशाबद्दल शिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी, आदींनी अभिनंदन केले आहे. प्रयोग यशस्वी करण्यासाठी संस्था प्रतिनिधी श्री अशोक गरूड, मुख्याध्यापक श्री रायभान जाधव, प्रा. नितीन ढोरमारे, आदी शिक्षक यांचे सहकार्य लाभले.
प्रयोगाचे नाव :- घाटातील वाहतूक बाबत अपघात टाळणे
शाळेचे नाव :- ज्ञानविकास प्राथमिक शाळा भराडी
प्रयोगास लागणारे साहित्य :- प्लाऊड, बॅटरी, सोलार, सेंसर, वायर, फोर व्हीलर, लाइट्स, कलर्स, वेस्टेज पुठ्ठा.
- सामाजिक दृष्टिकोन :- घाटामध्ये होणारे अपघात या प्रयोगाने टाळल्या जाऊ शकतात..
Discussion about this post