
प्रा.दिलीप नाईकवाड सिंदखेडराजा : तालुका प्रतिनिधी..
बोहल्यावर चढतानां नवीन नवरी नटावी अशी सजवलेली क्रुझर प्रारंभीच्या काळात खासगी वाहनांची हवी तेवढी रेलचेल नव्हतीच मॅटेडोअर मध्ये प्रवाशांना सोय व्हायची साखरखेर्डा येथील दौलतसेठ यांचे मॅटेडोअर ज्यामधे प्रवाशी प्रवास करीत होते.तेव्हा पासूनचा वाहनांचा अनुभव अत्यंत गरीबीतून पुढे आलेल्या साखरखेर्डा येथील शिवाजी गायकवाड या वाहन चालकाचा आयुष्यभर संघर्षमय प्रवास झाला.आई शेळ्या बकऱ्या चारायची वडील मोलमजुरी करणारे आज मात्र दोन्हीही अनंताच्या सफरीला गेलेले. त्यानंतर स्वतःची गाडी घेऊन अत्यंत काटेकोरपणे आणि प्रवाशांना भारतातील मुख्य आकर्षण असलेले पर्यटनस्थळे, देव देवितांची मंदिरे अशी लांबलचक सफर घडवित असतानां अठ्ठावीस वर्षात 30 लाख किलोमीटरवरचा प्रवास करत हजारो भाविकांना चारीधाम तसेच वेगवेगळ्या ठिकाणी देवदर्शन घडवले. जीव मुठीत धरून त्यांनी घडवलेला प्रवास खरंच भुषणावह असा आहे.
आज समाजातील कर्तृत्व केलेल्या परंतु समाजापासून दुर्लक्षित असलेल्या शिवाजी गायकवाड यांच्या सन्मानासाठी चांगली जागा निवडावी अशी इच्छा विदर्भ न्यायचे संतोष गाडेकर यांचे मनामध्ये होती .ग्रामीण परिसरामध्ये या वाहन चालक, मालकाला हे मानपत्र अर्पण करावं व समाजाने अशाही लोकांचा सन्मान करावा मनोमन त्यांची इच्छा होती .व विदर्भ न्यायची संपादक गाडेकर यांनी पर्यटनाच्या भटकंतीवर असतांनाच स्वतः च्या जीवाची पर्वा न करता इतरांच्या जीवाची काळजी घेत संपूर्ण देशात फिरवत घरी सुखरूप पोहोचवणाऱ्या शिवाजी गायकवाड यांचा सन्मान करण्याचा मोह गाडेकरांना आवरला नाही व पर्यटनावर असतांनाच शाल सन्मानपत्र देऊन त्यांनी गायकवाडचां सत्कार केला..
Discussion about this post