
छत्रपती संभाजीनगर,
कुसुमाग्रज यांच्या स्मृतीला अभिवादन करीत २७ फेब्रुवारी हा दिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने शहागंज येथील महाराष्ट्र हिंदी विद्यालयात ग्रंथालय तथा विद्यालयातील वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिन उत्साहत साजरा करण्यात आला. दरम्यान, विद्यार्थ्यांसाठी पुस्तक प्रदर्शनी लावण्यात आली; वाचन संस्कृती जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. साहेबराव पाटील यांची विविध लेखकांच्या उपस्थिती होती. प्रमुख वक्ते संदीप भदाणेप्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले.
सर्वप्रथम कवी वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस अभिवादन करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक रवींद्र तायडे होते. विचारपीठावर पर्यवेक्षक योगेश्वर निकम, वक्ते संदीप भदाणे,यांनी मराठी भाषेचा महिला वर्णिला. ‘माय माऊली आहे आमची वंद्य, अशी ही प्राण मराठी भावभावना जपणारी अन नात्यांमधली आण मराठी’ असे गौरवोद्वार त्यांनी काढले. मराठी भाषेच्या वैशिष्ट्यांबद्दल साहित्याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. अचूक लेखनासाठी मराठी शुद्धलेखन ही पुस्तिका विद्यार्थी व शिक्षकांना भेट स्वरूपात देण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र हिंदी ग्रंथालय तथा वाचनालयातर्फेआले होते. भदाणे यांनी महान लेखकांच्या पुस्तकांचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला. ‘वाचाल वाचाल हे तत्व अंगी बाळगावे असा संदेश त्यांनी दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार साहेबराव संत पाटील यांनी मानले. यावेळी सोनाली वाकळे, शुभांगी दसपुते, सुनीता गुंजाळ, सविता नागकीर्ती, अनिता मुदीराज, सोनाली देसले यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर, ग्रंथालय कर्मचारी उपस्थित होते..
Discussion about this post