

सुशील पवार, डांग..
डांग जिल्ह्यातील संकृतिधाम वासुर्णा येथे लायन्स क्लब वलसाड, तिथल रोड व आरएमडी आयुर्वेदिक हॉस्पिटल वागलधरा यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी शिबिर व चष्म्यांचे मोफत वाटप करण्यात आले. व पूज्य दीदींच्या आशीर्वादाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.या कार्यक्रमात 110 लहान मुलांची तपासणी व चष्मे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमात लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ.योगेशभाऊ देसाई, मंत्री संजीवभाई वाचानी, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. राज्यपाल हेमलभाई आणि झोन चेअर पर्सन फाल्गुनी खमर यांच्यासह सुमारे 10 आणि 14 डॉक्टरांच्या समूहने यशस्वी शिबिराचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तेजस्वीचे संस्कृतीधाम परिवार, धनसुखभाई बंटी भाई, मोहन, अश्विन, जितू भाई यांनी परिश्रम घेतले कारण या कामाचे गावातील व परिसरातील नागरिकांनी कौतुक केले..
Discussion about this post