
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्यासाठी आपल्या जीवनाचा बलिदान दिले. औरंगजेबाने त्यांच्यावर अमानुष छळ करून त्यांचे बलिदान घडवले, ही घटना मराठा इतिहासातील अत्यंत वेदनादायक आणि प्रेरणादायी आहे.
सध्या बलिदान मास सुरू असताना, औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे वक्तव्य देणे म्हणजे मराठा समाजाचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा घोर अपमान आहे.
स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड या वक्तव्याचा तीव्र निषेध करते आणि अबू आझमी यांनी त्वरित जाहीर माफी मागावी, अन्यथा उग्र आंदोलनाचा सामना करावा लागेल.
संभाजी महाराजांचा अपमान सहन केला जाणार नाही !
Discussion about this post