
सोयगाव :
गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे झालेल्या २६ व्या महाराष्ट्र राज्य क्रीडा महोत्सव स्पर्धेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बुद्धिबळ महिला संघाने प्रथम क्रमांक पटकावला.
बुद्धिबळ संघ (प्रथम) या खेळाच्या महिला गटाने घवघवीत व ऐतिहासिक यश संपादन करीत स्पर्धेत अव्वलस्थान पटकावले.
संघात संस्कृती वानखेडे, भाग्यश्री पाटील, तनिष्का बोरामणीकर, सानिया तडवी व संघमित्रा बोदडे यांचा समावेश होता, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिरीष पवार उपप्राचार्य रावसाहेब बारुटे यांनी संघाला शुभेच्छा दिल्या या संघाला डॉ नीलेश गाडेकर यांचे मार्गदर्शन लाभले..
Discussion about this post