
आज नाशिक महापालिकेत होणारे भ्रष्टाचार व कामे दिरंगाई या मुद्द्यावर लक्ष वेधण्यासाठी नाशिक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जन आंदोलन करत निवेदन देण्यात आले. तसेच काँग्रेस पक्षाने केलेल्या मागण्यावर त्वरित कारवाई करावी असे निवेदन दिले.
निवेदनातील मुख्य मुद्दे- कर्मचारी भरती, भूसंपादन मोबदला, सफाई कर्मचारी न्याय, हॉकर्स जोन निर्मिती, सिंहस्थ कुंभमेळा आराखडा, सिंहस्थ कुंभमेळा जागा, शहरातील पाणीपुरवठा, स्मार्ट सिटी खोदकाम , रस्त्यावरील खड्डे, गोदावरी नदी प्रदूषण, उद्यान सुरू करावे, नाट्यगृह सुरू करावे, महापालिकेचे उत्पन्न, जन्म मृत्यू नोंदणी, शहरातील मोकळ्या जागेवर पार्किंग, महापालिकेचे पाच वर्षाची श्वेतपत्रिका, एमआयडीसीतील रस्ते.
अशा अनेक विषयावर कारवाईसाठी काँग्रेसचे राजीव गांधी भवन येथे जन आंदोलन .
यावेळी नाशिक काँग्रेस कमिटीचे सर्व नेते पदाधिकारी उपस्थित होते. काँग्रेस शहर अध्यक्ष आकाशची छाजेड यांच्या नेतृत्वात जन आंदोलन करण्यात आले.
निवेदनावर सही राहुल दिवे, वसंत ठाकूर, ब्रिज किशोर दत्त, स्वप्निल पाटील, तन्वीर खान, स्वाती जाधव, जावेद इब्राहिम, गौरव सोनार, सुरेश मारु.
तसेच आंदोलनावेळी उपस्थित असलेले नेते काँग्रेसचे पदाधिकारी
चंदू साडे, भालचंद्र पाटील, लक्ष्मण धोत्रे ,शहाबाज मिर्झा ,जायभावे ,राजकुमार जेफ ,अण्णा मोरे ,रजाक दादा शेख ,कुसुम चव्हाण ,जूली डिसोजा ,सोफिया सिद्दिकी, गुड्डी आपा आदी नाशिक काँग्रेस चे कार्यकर्ते व नेते उपस्थित होते..
Discussion about this post