
निलेश सोनोने.
ग्रामीण प्रतिनिधी पातुर.
पातुर शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या बोर्डी नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक व इतर घातक कचरा टाकून त्यास आग लावण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना काल रात्री बारा वाजेच्या सुमारास बाळापुर नाका पुला जवळ घडली. चार ते पाच ट्रक टिप्परने तब्बल 50 टिप्स कचरा आणून नदीपात्रात टाकण्यात आला आणि त्यानंतर त्यास पेटवण्यात आला. व घटनेमुळे मोठ्या प्रमाणात विषारी वायू वातावरण पसरला त्यामुळे स्थानिक नागरिकांना श्वास घेण्यात अडचण निर्माण झाली. अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली या प्रकरणाची माहिती मिळताच काही जागरूक नागरिकांनी तातडीने नगर परिषद पातुर.च्या अग्निशामक दलाला कळविले. तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्यात आली मात्र या कचऱ्यामुळे शरीरातील हवा प्रदूषित झाली असून नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटी कॅमेरे बसविले आहेत त्यामुळे या कचऱ्याची वाहतूक करणारी वाहने कोणती होती त्यावरून संबंधिताची ओळख पटविणे शक्य आहे. मात्र नगरपरिषद पोलीस प्रशासन आणि पर्यावरण विभाग याबाबत कोणते पाऊल उचलत याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. हा प्रकार नेमका कोणी केला याबाबतचा सुद्धा नागरिकांमध्ये रोष आहे. या प्रकरणामुळे पर्यावरणाचा मोठा धोका निर्माण झाला असून संबंधितावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.या प्रकरणामुळे शहरवासीयांमध्ये तीर्वसंतापासून भविष्यात असे प्रकार पुन्हा घडू नये यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे. पातुर शहराच्या आरोग्यास आणि पर्यावरणास धोका निर्माण करणाऱ्या या प्रकरणाला जबाबदार असणाऱ्या व्यक्तींना त्वरित शोधून कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे. नगर प्रशासन आणि पोलीस खात्याने याची गाभारी यांनी दखल घ्यावी अन्यथा जनआंदोलन उभारण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे..
Discussion about this post