
या कारवाईच्या मालिकेमध्ये, गुन्हे शाखेने विना परवाना दारूची वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीला अटक करून ११ लाख ३६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
३ मार्च रोजी गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले यांना गुप्त माहिती मिळाली की, चंद्रपुरातून मोठ्या प्रमाणात अवैध दारूची वाहतूक होणार आहे. या माहितीच्या आधारे, चंद्रपूर शहरातील वीर सावरकर चौकात नाकाबंदी करण्यात आली.नाकाबंदीदरम्यान, एमएच ३४ सीडी ७११६ क्रमांकाची मारुती अर्टिगा कार संशयास्पद स्थितीत येताना दिसली.
पोलिसांनी कार थांबवून झडती घेतली असता, त्यामध्ये विना परवाना देशी-विदेशी दारू आणि बिअर असा एकूण १ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी खुशाल भैयाजी बांगडे (४०)रा. कोरपना याला अटक केली आहे. आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, मधुकर सामलवार, पोलीस कर्मचारी सुनील गौरकार, सतीश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार, प्रशांत नागोसे आणि दिनेश अराडे यांनी केली..
Discussion about this post