
शिराळा दि,५ प्रतिनिधी..
दलित पँथरचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री नामदेवराव ढसाळ यांच्या जीवन चरित्रावरील महेश बनसोडे दिग्दर्शित चल हल्ला बोल या चित्रपटास परवानगी नाकारुन नामदेव ढसाळ कोण ? आम्ही ओळखत नाही अशा पद्धतीची अवमानकारक नोटीस देणाऱ्या सेन्सॉर बोर्डच्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी भारतीय दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष दयानंद शिवजातक यांनी तहसीलदार शामला खोत यांच्याकडे केली.
निवेदनात म्हटले आहे, हिंदी, इंग्रजी व मराठी चित्रपटातील हिंसेला व अश्लीलतेला प्राधान्य देवून त्यांना परवानगी देणाऱ्या सेन्सॉर बोर्डला जागतिक दर्जाचे साहित्य निर्माण करणाऱ्या पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या कविता अश्लील व शिवराळ असल्याची कारणे देवून चित्रपटास परवानगी नाकारणे म्हणजे हा मुर्खपणाचा कळस आहे. शोषित, पीडित व उपेक्षितांचा हुंकार असणाऱ्या महानायकाचे साहित्य जगातील सात भाषेत प्रकाशित झाले आहे. त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. अशा थोर साहित्यिकाच्या जीवन चरित्रावर आधारीत चित्रपटास नोटीस देवून परवानगी नाकारणे म्हणजे शोषित, पीडित, उपेक्षितांचा आवाज दडपणे होय. दिलीप मोरे, विनोद आढाव, अमोल बडेकर, रोहित महिंद, शुभम साखरे, योगेश पवार, धनाजी तुपारे यांच्या सह्या आहेत..
Discussion about this post