

दिनांक 4 मार्च रोजी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक श्री. जी. श्रीकांत यांनी सिद्धार्थ उद्यानाची सविस्तर पाहणी केली. यावेळी त्यांनी प्राणी संग्रहालय, मत्स्य संग्रहालय, जलतरण पूल तसेच उद्यानातील विविध सुविधांची तपासणी करून आवश्यक सुधारणा व देखभालीसंदर्भात सूचना दिल्या.
या पाहणीदरम्यान मुख्य उद्यान अधिकारी श्री. विजय पाटील तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शहरातील पर्यावरण संवर्धन, जैवविविधता संरक्षण आणि नागरिकांसाठी उत्तम सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिका सातत्याने प्रयत्नशील आहे..
Discussion about this post