धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून आता नवा वाद सुरू झालाय. त्यातच आता संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आऱोपी वाल्मिक कराडचा राइट हँड समजला जाणारा सौरभ खराडे हा धनंजय मुंडे यांच्या भेटीला गेलाय. जवळपास अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ तो धनंजय मुंडे यांचं शासकीय निवासस्तान असलेल्या सातपुडा बंगल्यावर सौरभ खराडे दाखल झालाय. धनंजय मुंडेंचा राजीनामा, दोषारोपपत्रात कराडला प्रमुख आरोपी करण्यात आल्यानंतरच्या पार्श्वभूमीवर आता कराडचा पीए आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीमुळे नवे प्रश्न उपस्थित होत आहे..
Discussion about this post