
उदगीर /कमलाकर मुळे :
येथील छत्रपती शिवाजी राजे महाविद्यालयाच्या दुग्धशास्त्र विभागाच्या वतीने डोडला डेरी लिमिटेड, हैदराबाद यांच्या सहकार्याने कॅम्पस इंटरव्यू मोठ्या उत्साहात पार पडला. सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 या वेळेत महाविद्यालयाच्या परिसरात हा इंटरव्यू संपन्न झाला. या मुलाखतीसाठी केवळ उदगीरच नव्हे तर इतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुद्धा या संधीचा लाभ घेतला. यामध्ये एकूण 40 विद्यार्थ्यांनी मुलाखतीसाठी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी आपले तांत्रिक ज्ञान संवाद कौशल्य आणि व्यावसायिक क्षमता सिद्ध केली. डोडला डेरी लिमिटेड मधून हैदराबाद येथून इंटरव्यू घेण्याकरिता नागेंद्र कुमार वरिष्ठ व्यवस्थापक (मानव संसाधन) किरण कुमार ,प्रादेशिक व्यवसाय व्यवस्थापक महाराष्ट्र ब्रम्हय्या उपव्यवस्थापक (गुणवत्ता नियंत्रण), तृषाल, सहाय्यक व्यवस्थापक( दुग्ध खरेदी )रवि चंदन भरती कार्यकारी यांनी विद्यार्थ्यांना दुग्ध उद्योगातील संधी, गुणवत्ता नियंत्रण आणि दुग्ध व्यवसायातील आधुनिक प्रक्रिया तसेच शेती विषयक अत्याधुनिक प्रक्रिया याविषयी माहिती दिली .तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर आर.एम.मांजरे यांनी डोडला व्यवस्थापनाचे आभार व्यक्त करताना या संधीचा विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा. असे आवाहान व्यासपीठावर आय. क्यू. ए .सी. समन्वयक तथा विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉक्टर विष्णू पवार उपस्थित होते..
Discussion about this post