
गुरूदेव सेवा मंडळ व जनहित कल्याण संघटनेच्या संयुक्त विद्यमाने…..
अतुल कोवे : मारेगाव
तरूणाईच्या आयकॉन असलेल्या ख्यातनाम कीर्तनकार हभप शिवलीलाताई पाटील यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.
मारेगाव शहरात ह.भ.प कु शिवलिला पाटील यांचे जाहीर किर्तनाचा कार्यक्रम ११मार्च रोज मंगळवार रोजी सायंकाळी सहा वाजता नगरपंचायत पटअंगणात आयोजित करण्यात आले आहे. युवतींच्या प्रेरनास्थान असलेल्या हभप पाटील मारेगाव तालुक्यात प्रथमच येत आहे.
युवा किर्तणकार असलेले बिग बॉस मराठीच्या माध्यमातुन चर्चेत असलेल्या ह.भ.प शिवलिला पाटील येत आहे. जनहित कल्याण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती यांच्या वाढदिसवा निमित्त त्यांचा जाहीर किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तालुक्यातील महिला युवती युवक पुरुषांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे अवाहन जनहित कल्याण संघटना व गुरूदेव सेवा मंडळ मारेगाव तर्फे करण्यात आले आहेत.
शिवलीलाताई पाटील या प्रख्यात किर्तनकार असून त्या आपल्या किर्तनात समाज प्रबोधनपर बाबींना प्राधान्य देत असतात. सोशल मीडियातून त्यांचे अनेक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झालेले आहेत. यामुळे त्यांच्या किर्तनाला मोठी जनसमुदाय असतो. यातच मारेगाव शहरात नव्हे तर तालुक्यात त्या पहिल्यांदा येणार असल्याने या सोहळ्याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे..
Discussion about this post