अर्धापूर (प्रतिनिधी) –
ई- केवायसी केल्याशिवाय रेशनचे धान्य मिळणार नाही. त्यामुळे तालुक्यातील सर्व शिधापत्रिका धारकांनी ई-केवायसी लवकरात लवकर करून घ्यावी, असे आवाहन तहसीलदार रेणुकादास देवणीकर, नायब तहसीलदार पुरवठा विभागचे श्री दिनेश खंदारे यांनी केले आहे.
शिधापत्रिकेमधील कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड घेऊन सत्यपान (व्हेरिफिकेशन) इकेवायसी करून घेणे सक्तीचे आहे. ज्या व्यक्तींचे सत्यापन (व्हेरिफिकेशन) इकेवायसी केली नाही. त्यांचे शिधापत्रिकेतून नाव
वगळल्यास किंवा त्यांचे शिधाजिन्नस बंद होईल. त्यासाठी प्रशासन जबाबदार राहणार नाही.
त्यामुळे शिधापत्रिकाधारकांनी यासाठी लवकरात लवकर आधार सत्यापन (व्हेरिफिकेशन) इकेवायसी करणे चालू सर्व राशन दुकान जाऊन करावी तसेच तालुक्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांनी आरोग्य योजनेचे आयुष्यमान भारत याची सुद्धा पडताळणी करून घ्यावी असे आवाहन तहसीलदार रेणुकादास देवणीकर, नायब तहसीलदार पुरवठा विभागाचे निरीक्षक श्री दिनेश खंदारे साहेब यांनी केले आहे यावेळी अर्धापूर शहरातील सर्व रस्ता भाव दुकानदार उपस्थित होते..
Discussion about this post