लोहा प्रतिनिधी………….
महाराष्ट्र राज्याची माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण कंधार तालुक्यातील धाकटे पंढरपूर उंब्रज या ठिकाणी आले असता ,ते बोलत होते, उंब्रज तीर्थक्षेत्राला ब दर्जा मिळवून देणार व संस्थानाचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण शासन स्तरावर जेवढे प्रयत्न करता येतील ते करू आणि या तीर्थक्षेत्राला ब दर्जा मिळून देऊ असे बोलून दाखवले. कंधार तालुक्यातील तीर्थक्षेत्र श्री संत नामदेव महाराज
मठ संस्थानाच्या वतीने आयोजित केलेल्या 108 कुंडी विष्णू याग यज्ञ ,कलशारोहण सोहळा, अखंड हरिनाम सप्ताह ,व श्रीमद् भागवत कथा ज्ञान यग परमपूज्य देवकीनंदन जी ठाकूर महाराज यांच्या वाणीतून श्रवण करण्यास मिळत आहे. आज श्रीमद् भागवत कथा सोहळ्याचा पाचव्या दिवशी आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होती. यावेळी भाजपाचे लोहा कंधार चे नेते एकनाथ पवार ,भाजपचे जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे, जि.प. सदस्य विजय धोंडगे, जि.प. सदस्य चंद्रसेन पाटील गोंडगावकर, प.स. सदस्य सुनील धोंडगे, बालाजी पाटील पांडागळे माजी उपनगराध्यक्ष शरद पवार, भाजपाचे तालुका अध्यक्ष गंगाप्रसाद यन्नावार,प.स. सदस्य उत्तम चव्हाण यांची प्रमुख उपस्थित होते तसेच माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण व संतुकराव हंबर्डे यांचा सत्कार देवकीनंदन जी ठाकूर महाराज व श्री एकनाथ महाराज यांच्या हस्ते श्री संत एकनाथ महाराजांची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला तसे त्यांच्या हस्ते भागवत कथेची महाआरती करण्यात आली यावेळी हजारो भाविक भक्त उपस्थित होते..
Discussion about this post