वरोरा तालुका प्रतिनिधी :- उमेश कोटकर
अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरवर महसूल विभागाच्या गौण खनिज पथकाने कारवाई केली आहे ही कारवाई मंगळवार ला रात्रो नऊ च्या दरम्यान तालुक्यातील मानोरा गावाजवळ घडली, सदर ट्रॅक्टर आष्टा घाटावरून अवैध रेती भरून येत असल्याची गोपनीय माहिती गौण खनिज पथकाला मिळाल्यानंतर त्यांनी मानोरा गावाजवळ सदर ट्रॅक्टरवर कारवाई केली सदर ट्रॅक्टर शेगाव बु, येथील असल्याचे सांगण्यात आले सदर ट्रॅक्टर तहसील कार्यालयात लावण्यात आले असून पुढील कारवाई महसूल विभाग करीत आहे सदर कारवाई भद्रावती येथील तहसीलदार मनोज अकनूरवार, मंडळ अधिकारी समीर वाटेकर, शिपाई निर्दोष फुलभोगे यांनी केली.
सध्या आष्टा नदीवरून मोठ्या प्रमाणात दिवसरात्र अवैध रेतीची तस्करी सुरु असून कारवाई कमी असल्या कारणांनी रेती तस्कराचे मोठ्या प्रमाणात फावत आहे. काही रेती तस्करांना तर प्रशासनाची सुद्धा भीती उरलेली नसून पत्रकारांना सुद्धा धमकावण्याचा प्रकार शेगाव परिसरातील रेती तस्कर करीत आहे. त्यामुळे यांच्यावर महसूल विभाग, पोलीस प्रशासन, यांनी मोठ्या प्रमाणात कारवाईचा बडगा उभारण्याची गरज असल्याचे चित्र निर्माण झाले आहे…
Discussion about this post