महसूल विभाग केली रेतीमाफीयावर कारवाई
दोन अवैध रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त
चिमूर :– चिमूर तालुक्यात अवैधरित्या रेती माफिया बिनधास्त पणे रेती उत्खनन करून ट्रॅक्टरच्या साह्याने वाहतूक केली जाते मात्र याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे नागरिकांकडून चौकाचौकात चर्चा केली जात असल्याचे चित्र दिसून येत असतांनाच दोन ट्रॅक्टर अवैधरित्या रेतीची वाहतूक करता महसूल विभागाने केली धडक कारवाई दोन ट्रॅक्टर जप्त केले आहेत. महसूल प्रशासनाने अवैध रेती तस्करीला आळा घालण्यासाठी कठोर भूमिका घेतली असून, या कारवाया सातत्याने सुरू राहतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दिनांक 4 मार्च 2025 रोजी रात्री 8 वाजता मौजा कारेगाव येथे नायब तहसीलदार मनोज आकनुरवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कारवाई करत 1 ब्रास रेती अवैधरित्या वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त केला. ही कारवाई महसूल अधिकारी समीर वाटेकर (मंडळ अधिकारी, भद्रावती) आणि तलाठी दिनेश भिसीकर यांच्या सहकार्याने करण्यात आली. जप्त केलेल्या ट्रॅक्टरचे चेसिस नंबर MBNPFALKPNC01081 असून, तो महिंद्रा कंपनीचा आहे. सदर ट्रॅक्टरचा मालक सुशांत काटेकर (रा. शेगाव बु.) असून, चालक विलास शंकर डाखोरे (रा. शेगाव) असल्याचे स्पष्ट झाले आहे.
यानंतर, दिनांक 5 मार्च रोजी सकाळी 9:15 वाजता महसूल पथकाने पुन्हा एकदा कारवाई करत 1 ब्रास रेती भरलेला आणखी एक ट्रॅक्टर जप्त केला. सदर ट्रॅक्टरचा मालक तुळशीराम श्रीरामे, तर चालक विश्वास तुळशीराम श्रीरामे असून, ट्रॅक्टरचे चेसिस नंबर MBNPFALKPNNNI00266 आहे.
अवैध रेती तस्करी रोखण्यासाठी महसूल विभाग सतर्क असून, जप्त केलेली वाहने आणि रेती पुढील कारवाईसाठी तहसीलदार कार्यालयाकडे सुपूर्त करण्यात आली आहेत. तालुक्यात अवैध रेती उपशाला आळा घालण्यासाठी महसूल विभागाची ही मोहीम पुढेही सुरू राहील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Discussion about this post