
सारथी महारष्ट्राचा,उदगीर तालुका प्रतीनिधी: …. मौजे वंजारवाडा येथे जगाचोरीचा प्रताप उघड़कीस आला आहे.बातमी आशी की, जळकोट तालुक्यातील वंजारवाड़ा या गावात समतानायक महात्मा बसवेश्वर माहाराज यांचे अर्धाकृति स्मारक आहे. त्या स्मारकाच्या पाठीमागे “मिना संभाजी घूळे “यांचे घर बांधकाम सुरु आहे.
बांधकाम करनाऱ्या व्यक्तिची प्रत्यक्षात जागा नमूना आठ नुसार 20×24 आहे. या व्यक्तिनी मात्र बांधकाम 24×29 एवढ्या जमीन क्षेत्रावर केले आहे. जे,की बेकायदेशिर असून,महापुरुषाचा अपमान करणारे कुकृत आहे.

या बेकायदेशिर बांधकामा विरोधात शिवा संघटना लातूर जिल्हा शाखा सर्व शक्तिनिशी मैदानात उतरणार आहे आशी माहिती शिवा संघटनेच जिल्हाध्यक्ष adv, विलास खिंडे यांनी दिली ते “सारथी महाराष्ट्राचा “शी बोलताना म्हणाले की, अखिल भारतीय वीरशेव लिंगायत युवक संघटना, शिवा संघटाना कायमच अन्यायच्या विरोधात खंभीर पणे उभा टाकत असते.
वंजारवाडीच्या अन्यायकारी प्रकरणात आम्ही, शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा मनोहर धोंडे सर यांच्या मार्गदर्शनानुसार वाटचाल करत आहोत.
या विषयावर गेल्या 25/2/2025 रोजी भक्तिस्थळ अहमदपुर येथे वंजारवाडा ग्रामस्थासोबत बैठक झाली असून ठरलेल्या रणनीति नुसार शिवा संघटना कायदेशीरपणे व सविधानाने दिलेल्या सर्व अधिकाराचा वापर करुण या प्रकारणात वंजारवाडी ग्रामस्थाना न्याय देणार आहे.

शिवा संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, दत्ताभाऊ खंकरेशिवा संघटनेचे ,सचिन मगनाळे यांनी विशेष लक्ष घातले असून स्मारकाची पाहानी दत्ता भाऊ खंकरे यांच्या उपस्थिती मध्ये झाली आहे.या प्रकारनात न्याय मिळावा म्हणून सर्व ग्रामस्थ तळमळीने पुढाकार घेऊन काम करत आहेत.
दिनांक 25/2/2024 रोजी जळकोट तालुक्याचे मा. तहसीलदार यांना, अतिक्रमण हटवन्याबाबत चे लेखी निवेदण दिले आहे. निवेदनावर वंजरवाडा शाखा अध्यक्ष, श्री सोपान थोटे, उपाध्यक्ष शंकर शिवपुजे सचिव, गोविंद बनाळे सह शेकड़ो ग्रामस्थाच्या स्वाक्षरी आहेत.
निवेदनात तत्काळ अतिक्रमण हटवण्याची विनंती केली आहे,मात्र प्रशासन यात कार्यवाही करत नसेल तर शिवा संघटना तीव्र आंदोलन करेल असा इशाराही निवेदनात दिला आहे. या निवेदनाची एक प्रत मा. जिल्हाधिकारी लातूर यांना दिली आहे.

या प्रकारणात काही प्रशासकीय कर्मचारी व ग्रामपंचयत मधील काही कर्मचारी,बेकायदेशीरपणे अर्थिक व्यवहार करुण,लाच घेऊन संबधित प्रकारणातील दोषी व्यक्तिस सहकार्य करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्या सर्व कर्मचारी अधिकारी ची शिवा संघटना, चौकशी लावणार असून त्यांच्यावर निलंबिनाची कार्यवाही करण्यासाठी नैतिक दबाव करणार आहे.
आशी माहिती शिवा संघटनेच जिल्हा अध्यक्ष,विलास खिंडे. यांनी दिली आहे.

Discussion about this post