शेतकर्यांना एकाच वेळी आणि एकाच जागी कृषी क्षेत्रातील आणि त्याच्याशी निगडीत आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या उद्देशाने जिल्ह्यात सर्वात मोठे किसान कृषी प्रदर्शन संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री येथे खांडसरी मैदान, दरी फाटा पेट्रोल पंपासमोर येथे दि.6 ते 10 मार्च पर्यंत सुरू राहणार आहे.
विविध विषयांवरील दालने आणि दोनशेहून अधिक स्टॉलचा सहभाग असलेल्या या प्रदर्शनाला सिल्लोड तालुक्यातीलही अधिक शेतकरी, शेतीनिष्ठ नागरिकांनी भेट द्यावी
असे आवाहन सिल्लोड भाजपा तालुकाध्यक्ष श्री. अशोकदादा गरुड यांनी केले.
भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. सुहास त्रिंबकराव शिरसाठ व मित्रमंडळ, वतीने आयोजित कृषी प्रदर्शन होणार असून, शेती व निगडित आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती शेतकर्यांना व्हावी, म्हणून किसान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले .आधुनिक तंत्रज्ञान व कृषि क्षेत्रातील नवे विचार शेतकर्यापर्यंत पोहोचविणे हे या प्रदर्शनाचे उद्दिष्ट आहे. शेतकरी, तंत्रज्ञ आणि उद्योजक अशा सर्वांसाठी उपयुक्त ठरेल अशी या प्रदर्शनाची रचना करण्यात येणार आहे.
यात अनेक कंपन्या, शासन, संशोधन संस्था सहभागी होत आहेत. संरक्षित शेती, पाणी व्यवस्थापन, कृषी निविष्ठा, कृषी अवजारे, पशुधन, ग्रामविकास, जैव, ऊर्जा, नर्सरी, शेती लघुउद्योग आदी क्षेत्रातील नामवंत कंपन्या/संस्था सहभागी होणार आहेत.भारतीय शेतकर्यांच्या गरजा व बाजारपेठ जाणून घेण्याचा या कंपन्यांचा उद्देश असल्याचे म्हटले जात आहे. याशिवाय ऑटोमोबाईल्स, डेअरी, पशुसंवर्धन, पशुखाद्य, नर्सरी, कृषी प्रकाशने, अपारंपरिक ऊर्जा साधनांचे दालनदेखील शेतकर्यांना बघायला मिळणार आहेत. या व्यतिरिक्त दुग्ध व्यवसायात सर्वासाठी आकर्षण म्हणून 3 फूट उंचीची भारतीय पुंगणुर गाय हे दालन किसान प्रदर्शनातील मुख्य आकर्षण ठरणार आहे.
प्रत्येक दालनात त्या विशिष्ट विभागातील स्टॉलला भेट देण्याची संधी शेतकर्यांना मिळणार आहे. शेतीसाठी लागणारी यंत्रे व उपकरणांचे प्रदर्शन खुल्या जागेत ठेवण्यात येणार आहे. कृषी क्षेत्रात येऊ घातलेले नवीन तंत्रज्ञान, त्यामुळे निर्माण होणार्या संधीची माहिती शेतकर्यांना मिळाल्याचे दिसून आले आहे.
शेतकऱ्यांना शेतीसंदर्भात येणाऱ्या प्रत्येक अडचणी विषयी तज्ञांचे मार्गदर्शन,बचत गटांना मोफत स्टॉल मांडणी सुविधा,विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन असणार आहे..
Discussion about this post