
सोयगाव :
शेतात कपाशी पिकांतील ठिबकचा नळ्या गोळा करतांना मागावर येऊन रानडुकराने हल्ला चढवून शेत मजुरास गंभीर जखमी केल्याची घटना गुरुवारी (दी.०६) जरंडी शिवारात दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनी घडली.या घटनेत गंभीर झालेल्या शेत मजुरावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
शब्बीर हबीब सय्यद ( वय-६०) हे मजुरी साठी जरंडी शिवारात गट क्र-२१९ मध्ये कपाशी पिकातील ठिबकच्या नळ्या गोळा करत होते.पाठी मागून धावत आलेल्या रानडुक्करने त्यांचे वर जोरदार हल्ला चढवून त्यांच्या मांडीचा, पायाचा व हातांचे लचके तोडून गंभीर जखमी केले आहे. त्यांना तातडीने अशोक महाजन,विजय चौधरी, विष्णू वाघ,उत्तम गवळे आदींनी खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले आहे. त्यांचेवर उपचार सुरु आहे. वनविभाग सोयगाव यांना घटनेची माहिती विष्णू वाघ यांनी फोन वरून दिली आहे. अद्यापही घटनेचा पंचनामा झाला नव्हता..
Discussion about this post