
एखाद्या कलाकाराला महाराष्ट्र बाहेर आणि तोही जागतिक स्तरावर अवॉर्ड मिळावा ही बाब त्या कलाकारासाठी प्रचंड मोठी असते.
आणि हेच माझ्या बाबतीत झाले आहे,आदरणीय संगीतकार जॉली दादा मोरे यांनी आदरणीय प्रो विजयकुमार गवई सर,तायडे मामा,कवी किरण सोनवणे यांच्या मार्गदर्शनाने “We The People” या कार्यक्रमाची निर्मिती केली आणि माझ्यातील शाहिरी कलेने अल्पावधीतच गगनभरारी घेतली.त्यातच विचार मंच्यावर माता रमाई साकारताना प्रचंड मेहनत आणि निष्ठेने रमा माऊली उभी केली. आणि म्हणूनच या कलेची नोंद घेऊन 8 मार्च 2025 रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्त माता रमाई आंबेडकर इंटरनॅशनल अवॉर्ड 2025 घोषित झाला असून तो 8 मार्च रोजी दिल्ली येथे प्रदान करण्यात येणार आहे,उडान या संस्थेचे आम्ही सर्वजण खुप खुप आभारी आहे की महाराष्ट्रातून माझ्या कलेची नोंद घेऊन एवढा मोठा मानसन्मान मिळत आहे माझी आई सुभद्रा गुरव,आमचे प्रेरणा स्थान आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब,प्रो विजयकुमार गवई सर, तायडे मामा,
आदरणीय प्रेमानंद जगताप आणि ग्रेट संगीतकार जॉली दादा मोरे,प्रमोद जाधव, माझा मुलगा अभिषेक पाटील आणि “we the people” ची सर्व कलावंत टीम तसेच आद चंद्रकांत फडतरे, चंद्रकांत जगताप,बबन दादा गायकवाड, आनंद म्हस्के,आत्माराम सपकाळ,काजिर्डेकर गुरुजी,त्रिभुवन गुरुजी, डॉ शारद सावंत,सूर्यकांत खरात,रवींद्रमोरे,शुभांगी ताई,पद्मावती मोरे,सुदडे मॅडम,यांचा यात सन्माना मध्ये मोलाचा वाटा आहे.
तुम्हा सर्वांच्या मंगल कामना मुळे हे श्यक्य झाले..
Discussion about this post