लोहा प्रतिनिधी………. लोहा तालुक्यातील असलेले युवा नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जाधव यांची क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
ही निवड पुणे येथे बोलवण्यात आलेल्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकारणी बैठकीत संघटनेचे अध्यक्ष श्री रविकांत तुपकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या बैठकीत सामाजिक क्षेत्रात शेतकऱ्यांचे मोर्चे ,आंदोलने ,उपोषण अशा प्रकारची प्रश्न शासन दरबारी लावून धरुन सोडवत असलेल्या कार्याची दखल घेऊन बाळासाहेब जाधव यांची नांदेड जिल्ह्याच्या अध्यक्षपदी नेमणूक करून नियुक्ती प्रमाणपत्र देण्यात आले.
तसेच पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
Discussion about this post