जगदीप वनशिवपुणे – येथील दलित स्वयंसेवक संघाच्या पुणे मुख्यालयात आचार्य रतनलाल सोनाग्रा यांनी लिहिलेल्या ” अण्णा भाऊंच्या सहवासात ” या सचित्र ग्रंथाचे प्रकाशन अण्णा भाऊंचे सहकारी प्रसिद्ध चित्रकार दिवंगत नाथ वैराळे यांच्या पत्नी कुसुमताई वैराळे यांच्या शुभहस्ते तसेच बिहारचे प्रसिद्ध लेखक डॉ.लखन लालसिंह आरोही,सेवानिवृत्त
सनदी अधिकारी व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ.लक्ष्मीकांत देशमुख,दलित स्वयंसेवक संघाचे संघ प्रमुख राजाभाऊ धडे,माजी संघप्रमुख दादासाहेब सोनवणे,जेष्ठ साहित्यिका सुभा आत्माराम लोंढे प्रदेश कार्याध्यक्ष विजयकुमार कांबळे यांच्या उपस्थितीत पार पडला.कार्यक्रमाचा प्रारंभ शाहीर सदाशिव भिसे,शाहीर बाबासाहेब जाधव, विजयकुमार
कांबळे,किशोर कसबे यांच्या स्फूर्ती गीतांनी व सुभा आत्माराम लोंढे यांच्या भारतीय राज्य घटनेच्या प्रस्ताविका वाचनाने करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजयकुमार कांबळे यांनी केले दलित स्वयंसेवक संघाचे गेल्या ४८ वर्षांत केलेल्या कार्याची माहिती देत असताना गेली ३७ वर्षांत ४१६ व्याख्यान अविरत पणे चालू असून त्याचे श्रेय दादासाहेब सोनवणे यांना जात असल्याचे सांगितले.या प्रसंगी डॉ.लक्ष्मीकांत देशमुख यांनी अण्णा भाऊंच्या
साहित्याचे मार्मिक विवेचन करीत ते जागतिक विचारवंत होते.परंतु त्यांना त्यांच्या हयातीत योग्य न्याय मिळाला नसल्याचे स्पष्ट केले.बिहारचे साहित्यिक आरोही यांनी हिंदी मध्ये अण्णा भाऊंच्या साहित्याचे विश्लेषण केले. आचार्य रतनलाल सोनाग्रा यांनी अण्णा भाऊंचे चरित्रग्रंथ हिंदी मध्ये प्रकाशित करुन सर्व भारतभर अण्णा भाऊंचे साहित्य प्रसारीत केल्या बद्दल मनापासून धन्यवाद व्यक्त
केले.लेखकीय मनोगत व्यक्त करताना आचार्य सोनाग्रा म्हणाले अण्णा भाऊ साठे यांच्या सहवासातील अनेक प्रसंग कथन केले.महाराष्ट्रातील पहिले दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद अण्णा भाऊ यांना ऐनवेळेस देण्यात आले होते.त्यावेळी त्यांनी अध्यक्षीय भाषणात दलित व श्रमिकांना देण्यात येणारी वागणुक व दलित लेखकानी वास्तवतेचे भान ठेऊन लेखन करावे.
याच वेळी त्यांनी ” पृथ्वी ही शेष नागाच्या मस्तकावर तरली नसून ती दलित व श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे.” हे जगप्रसिद्ध वास्तविक तत्त्वज्ञान याच संमेलनात मांडल्याची आठवण त्यांनी सांगितली.अण्णाभाऊंच्या प्रसिद्ध फकीरा कादंबरी वर आधारित फकिरा चित्रपट निर्मिती मध्ये त्यांनी संपूर्ण सहभाग घेतल्याचे व या चित्रपटा चे पटकथा लेखक के.ए. अब्बास यांच्या आठवणी
सांगितल्या असून अण्णा भाऊंचे चित्रपट क्षेत्रातील अभिनेते बलराज सहानी,एक.के.हंगल गीतकार शैलेन्द्र यांच्याशी खुप जवळचे संबंध असल्याचे त्यांनी सांगितले दादासाहेब सोनवणे यांनी आचार्य रतनलाल सोनाग्रा यांचे व आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार करुन आभार व्यक्त केले.आभार व्यक्त करताना दलित स्वयंसेवक संघ ही मातंग समाजातील पहिली फुले शाहू आंबेडकर पुरोगामी पुरोगामी
संघटना असुन समाजातील अंधश्रद्धा,रुढी परंपरा, वाघ्या-मुरळीपोतराजकी,ग्रहण मागणे ह्या अंधश्रद्धेतून निर्माण झालेल्या प्रथा बंद करुन शिक्षणाचा प्रसार करीत आहोत.असे विचार मांडले.या ग्रंथ प्रकाशन सोहळ्याचे नियोजन व सूत्रसंचलन नटश्रेष्ठ कुमार अहिर यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने केले.या प्रसंगी कावेरीताई
जाधव,कलावती तुपसुंदर,अलकाताई जोगदंड, संदीप(सनी) जाधव, शौर्य अकॅडमी चे हरिदास भिसे,अमोल लोंढे व अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. पुणे येथील दलित स्वयंसेवक संघाच्या सभागृहात संपन्न झाला
Discussion about this post