अन्वा ता. भोकरदन जि. जालना या गावातील गरीब शेतकरी कैलास बोराडे या 36 वर्षीय तरुणास गावातील गुंडांनी अमानुषपणे मारहाण केली.
महादेवाच्या मंदिरामध्ये का आलास असे म्हणून त्याला मारहाण केली. गरम तप्त सळयांनी अंगावर हातापायावर, पोटावर आणि गुद्दद्वारावर चटके दिले.
चटके दिलेल्या जखमा खोलवर गेल्या आहेत.26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीला रात्री कैलास बोराडे यांच्यावर निर्दयपणे हल्ला केला, मंदिरात का आलास असे म्हणून राक्षसी वृत्ती च्या लोकांनी मारहाण केली व चटके दिले आणि इतर दहा ते बारा लोक त्या ठिकाणी उपस्थित होते.
कैलास बोराडे यांच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन झाले पाहिजे.
भविष्यात कैलास बोराडे काम करू शकणार नाही याचा विचार करून त्यांना आर्थिक मदत सरकारने केली पाहिजे अशी मागणी माझे मत आहे .
Discussion about this post