सांगली शहरातील नेहमी वर्दळीचा असणारा दत्त मारूती रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम आयुक्त शुभम गुप्ता यांच्या आदेशानुसार पार पडली प्रभाग समिती क्र १ मधील मारूती रस्ता,कापड पेठ,भाजी मंडई येथील व्यावसायिकांनी आपल्या दुकाना समोर छपरी,मांडव, कमानी उभारून रस्त्यावरील जागा व्यापली होती सहा आयुक्त सहदेव कावडे यांच्या नेतृत्वाखाली उप आयुक्त श्री वैभव साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हि अतिक्रमणे काढण्याची कारवाई करण्यात आली, मारूती रस्ता,कापड पेठ,भाजी मंडई येथील व्यावसायिक दुकानासमोर छपरी,मांडव, कमानी उभारून रोडवर अतिक्रमण केले होते,त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत असल्याचे तक्रारी वारंवार होत असतात. वाहतुकीस अडचण निर्माण होत असते ही बाब विचारत घेऊन आज मोहीम राबविण्यात आली आहे.मोहिमेत हा संपूर्ण परिसर अतिक्रमण मुक्त करण्यात आला.अशी माहिती सहा आयुक्त श्री कावडे यांनी दिली आहे. 13 दुकानांसमोरील पत्रे,कापडी शेड,तीन हातगाडी, तोडण्यात आले आहे, रस्त्यावरील साहित्य हटविण्यात आले. सूचना देण्यात आला आहे. सदर मोहिमेत सहभागी ,
अतिक्रमण पथक,प्रमुख दिलीप घोरपडे, स्वच्छता निरीक्षक धनंजय कांबळे,सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे यांनी सहभाग घेतला
Discussion about this post