
गेवराई प्रतिनिधि :-
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार यांनी बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी तरुण, तडफदार, सर्व प्रश्नांची जाण असलेले विकासाभिमुख, अनुभवी व अभ्यासू नेतृत्व असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार अमरसिंह उर्फ भैय्यासाहेब पंडित यांना विधान परिषदेवर संधी देऊन मंत्रीपद द्यावे आणि त्यांना बीड जिल्ह्याचे पालकमंत्री करावे, अशी मागणी पत्रकार शेख जावेद सर यांनी केली आहे.
याबाबत पत्रकार शेख जावेद सर यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, अमरसिंह उर्फ भैय्यासाहेब पंडित हे सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालणारे आणि सबका साथ सबका विकास साधणारे धडाडीचे नेतृत्व असून सत्ता असो वा नसो शिवछत्र परिवाराच्या छत्रछायेखाली त्यांची जनसेवा अखंडितपणे सुरूच असते. ते गोरगरिबांच्या सुखदुःखात नेहमी सहभागी होतात, त्यांच्या अडीअडचणी सोडवितात आणि संकटकाळी त्यांच्या मदतीला धावून जातात. ते इतर नेत्यांप्रमाणे सत्ता गेल्यानंतर आपला मोबाईल नॉट रिचेबल ठेवणारे आणि जनतेला वाऱ्यावर सोडून देणारे नेतृत्व नसून २४ तास जनसंपर्कात असणारे नेते आहेत.
शारदा प्रतिष्ठानच्यावतीने सामूहिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत हजारो गोरगरिबांचे संसार उभे केले असून कोरोना सारख्या महामारीच्या काळात स्थानिक लोकप्रतिनिधी दार बंद करून घरात बसलेले असताना भैय्यासाहेबांनी मात्र गेवराई तालुक्यात कोविड सेंटर उभारून रुग्णसेवा केली. त्यांचा दांडगा अभ्यास व प्रश्नांची जाण असल्याने ते फक्त आपल्या मतदारसंघातील जनतेचे प्रश्नच नव्हे तर बीड जिल्ह्यातील जनतेचे प्रश्नही सोडवितात. शिवछत्र वर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेला सर्वसामान्य, गोरगरीब माणूस कधीच रिक्त हस्ते परत जात नाही. शेतकऱ्यांचा प्रश्न असो, पाण्याचा प्रश्न असो की जनतेचा कोणताही प्रश्न असो भैय्यासाहेब ते सोडविण्यासाठी नेहमी अग्रेसर असतात. बीड जिल्ह्याला पालकमंत्री नसल्यामुळे सध्या हा जिल्हा पोरका झालेला आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार यांनी बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी तरुण, तडफदार, सर्व प्रश्नांची जाण असलेले विकासाभिमुख, अनुभवी व अभ्यासू नेतृत्व असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार अमरसिंह पंडित यांना विधान परिषदेवर संधी देऊन मंत्रीपद द्यावे आणि त्यांना बीड जिल्ह्याचे पालकमंत्री करावे, अशी मागणी पत्रकार शेख जावेद सर यांनी केली आहे..
Discussion about this post