
पालम तालुका प्रतिनिधी : सय्यद मैनोदिन..
परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्याच्या हद्दीत पेठ शिवणी येथे पालम पोलिस पथकाने दिनांक ६ मार्च रोजी दुपारी अकरा वाजता दुपारी कारवाई केली असता २ लाख ३० हजार ६८० रुपयांचा गुटखा केला जप्त.या प्रसंगी पालम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार माहिती मिळवत
पोलिस ठाण्याचे पथक गस्त घालीत असताना अज्ञात व्यक्ती कडून एका वाहनातून गुटखा येत असल्याची माहिती मिळाली, या वरुन पोलिसांनी गाडी क्रमांक एम.एच.१४ डि.एफ.०६३३ या वाहनांची चौकशी केली असता या मध्ये सुगंधित तंबाखू व अन्य प्रकारच्या गुटखा पुडे व बॅग आढळून आला असून पोलिसांनी वाहनांसह गुटखा जप्त केला.
याबाबत पोलिस हवालदार शंकर कोलमवाड यांच्या फिर्यादीनुसार मानिक बापुराव कदम (३८)रा.शिवाजि नगर पुर्णा यास ताब्यात घेतले असून सदरिल घटनेचा तपास पोलीस निरीक्षक गणेश सवंडकर अधिक तपास करीत आहेत.सदरिल घटनेच्या संदर्भावरुन असे दिसून येते की,
एकिकडे महाराष्ट्र शासनाने गुटखा बंदी घालण्यात आली आहे, आणि अशा प्रकारच्या दररोज अनेक घटना घडत असतात सदरिल घटनेमुळे जनतेच्या मनात अनेक शंका उपस्थित केल्या जातात..
Discussion about this post