बि.एस.एन.एल कडे ग्राहकांचा वाढता जोर पण परिसरात रेंज च मिळत नाही.
ता. प्रतिनिधी – देविदास वायाळ
मोबाईल ग्राहकांना सेवा देणाऱ्या जीओ, एअरटेल आणि आयडिया वोडाफोन कंपन्यानी मागील एक महिन्यापासून रिचार्जचे भाव दीडपट वाढवल्यापासून मोबाईल ग्राहकांनी सरकारी कंपनी बि.एस.एन.एल.कडे धाव घेतली आहे. बि.एस.एन.एल.चे रिचार्ज चे भाव दीड पटीने कमी असल्यामुळे बि.एस.एन.एल.कडे धाव घेतली असून सिमकार्ड पोर्ट करणे व नवीन सिमकार्ड खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे.परंतु खळेगाव, महारचिकना, कोनाटी, कंडारी, भंडारी परिसरात टॉवरच नसल्यामुळे ग्राहकांना रेंज मिळत नाही. त्यामुळे सरकारी कंपनी बि.एस.एन.एल.ने ग्राहकांच्या सेवेसाठी जागोजागी टॉवर वाढविण्यासाठी लक्ष द्यावे.अशी मागणी ग्राहकांकडून होतांना दिसत आहे.
Discussion about this post