श्री. रवळनाथ प्राथमिक विद्यामंदिर येथे ८ मार्च जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न..
आजरा: तालुका प्रतिनिधी,
आजरा येथील श्री.रवळनाथ प्राथमिक विदयामंदिर ८ मार्च जागतिक महिला दिन साजरा करणेत आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस शाळेच्या मुख्याध्यापिका सौं उज्वला देसाई आणि पालक श्रीमती सारीका पाटील यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हार घालून करण्यात आले. या कार्यक्रमाला सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
सौ विजया पोतदार, सौ. निलांबरी कामत यांनी जागतिक महिला दिना निमीत्य आपले मनोगत व्यक्त केले त्या म्हणाल्या महिला दिन केव्हांपासून साजरा केला जातो तसेच आजची स्त्री अबला नसून ती सबला झाली आहे. आज पर्यंत ज्या महिलांनी महान कार्य केली आणि करत आहेत त्यांच्या कामाचा उल्लेख त्यांनी आपले मनोगतातून केले
सौ रेश्मा कुराडे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले तर आभार रविना घेवडे यांनी मानले
Discussion about this post