
सातारा : (अनिलकुमार कदम प्रतिनिधी )
साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत मातंग समाजातील महिला व पुरुष यांना महामंडळाच्या थेट कर्ज योजनेंतर्गत एक लाख रुपये सन २०२४-२५ करीत कर्ज देण्याचे मुख्य कार्यालय मुंबई यांचे परिपत्रक प्राप्त झाले आहे. कर्ज प्रस्ताव भौतिक ३० लाभार्थीचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून महामंडळाच्या विहित नमुन्यातील अर्ज तसेच जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, तहसीलदार यांचा तीन लाखाच्या आतील, आधार कार्ड, पॅन कार्ड, कोटेशन इत्यादी कागदपत्रांसह घेऊन महामंडळाच्या जिल्हा कार्यालयास समक्ष येऊन दिनांक २० मार्च २०२५ पर्यंत कर्ज प्रस्ताव दोन प्रतीत जमा करण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक विठ्ठल वायदंडे यांनी केले आहे..
Discussion about this post