तालुका प्रतिनिधी :- (१०मार्च २०२५)काष्टी.. मा.आ.श्री.बबनरावजी पाचपुते यांनी सन 2009 या वर्षी शैक्षणिक भविष्याचा विचार करून काष्टी सारख्या गावात परिक्रमा शैक्षणिक संकुलाची सुरवात केली.
आजचा काळात परिक्रमा तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे नाव संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत आहे, येथील शिक्षणाचा दर्जा, उत्कृष्ठ वसतिगृह तसेच इतर असणाऱ्या सुविधा त्यामुळे महाराष्ट्रातून विद्यार्थी विद्यार्थिनी येथे शिक्षणासाठी प्रवेश घेत आहेत, त्यातच या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाची यशोगाथा कायम राखली आहे. क्रीडा क्षेत्रात विविध खेळांमध्ये राज्यस्तरीय स्पर्धेपर्यंत मजल, NPTL परीक्षेमध्ये 375 विद्यार्थ्यांची नोंदणी.तसेच काल 39 विद्यार्थ्यांची नामांकित कंपनी बजाज ऑटो लिमिटेड आकुर्डी,पुणे.यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कॉलेज इंटरव्यू मध्ये मैकेनिकल आणि इलेक्ट्रिकल विभाग मधील विद्यार्थ्यांची ट्रेनी इंजीनियर (Trainee Engineer. ) म्हणून निवड झाली आहे . या सर्व विद्यार्थ्यांचे मा. ना. श्री बबनरावजी पाचपुते विचारधारा ट्रस्टचे संस्थापक माजी मंत्री श्री. बबनरावजी (दादा) पाचपुते, संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सौ. प्रतिभाताई बबनरावजी पाचपुते, सचिव मा.श्री. आमदार विक्रमसिंह बबनरावजी पाचपुते, मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. अॅड. प्रतापसिंह बबनरावजी पाचपुते, अॅकॅडेमिक डायरेक्टर मा.सौ. इंद्रायणी प्रतापसिंह पाचपुते, मुख्य प्रशासकीय अधिकारी व अतिरीक्त कार्यकारी अधिकारी श्री. अनिल पुंड सर, डेप्युटी अॅकॅडेमिक डायरेक्टर प्रा.डॉ.संजीव कदमपाटील सर तसेच परिक्रमा तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत सूर्यवंशी सर, इंजिनिअरिंग प्राचार्य डॉ. मोहन धगाटे सर, बी.फार्मसी प्राचार्य डॉ. सुनिल निर्मळ सर, एमबीए डायरेक्टर डॉ. सुदर्शन गिरमकर,सायन्स प्राचार्य डॉ. पी.ए. इथापे सर, व डी.फार्मसी प्राचार्य डॉ.रमेश शिंदे सर तसेच ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी श्री. आर. के. धेंडे सर, प्रा.भूषण पाचपुते,प्रा.दत्तात्रेय पासलकर, प्रा.एस.सोमवंशी, प्रा.प्राजक्ता पाचपुते,प्रा.प्रतिक्षा ओव्हाळ, प्रा.एस.माकुडे.प्रा.पी.ब्राम्हणेकर, प्रा.योगिता काळाने प्रा.स्वप्निल मचाले व सर्व विभाग प्रमुख व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या विद्यार्थ्यांच्या निवडीमुळे विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.तसेच विद्यार्थी आणि सर्व शिक्षकांचे कौतुक होत आहे.
Discussion about this post