
प्रतिनिधी : मारोती धुप्पेकर 7498674201
मंडाळा गावाजवळील रस्त्यावर अज्ञात वाहणाने धडक दिल्याने जखमि अवस्थेत घुबड रस्त्यावर पडले तेव्हा रस्त्याने पेट्रोलिंग करत आसलेले साहयक मोटार वाहन निरीक्षक नितीन राख साहेब यांची सहज नजर त्या घुबडाकडे गेली तेव्हा त्यांच्या लक्षात आले की सदरील घुबड हे जखमी अवस्थेत आहे. तेव्हा त्यांनी लगेच वाहन चालक अशोक टोमके यांना आपले वाहण परतुन घेण्यास सांगितले तेव्हा घुबडाला उचलुन त्याला बघितले. तेव्हा तो जखमी अवस्थेत आहे असे लक्षात आले. त्यांनी सोबत आसलेल्या साहयक मोटार वाहन निरीक्षक कलाले मॅडम व राख साहेब आणि चालक यांनी लगेच वनरक्षक आधिकारी वसंत सोपानराव मुंडे यांना फोन केला.तेव्हा त्यांनी वनमजुर यांना रघुनाथ शिंदे व ढेरे यांना पाठवुन दिले तेव्हा पशुवैद्यकिय अधिकारी यांनी तपासणी करून उपचार केला.
धावपळीच्या जीवनात त्या घुबडाला जखमि अवस्थेत न सोडता त्याला जिवदान देऊन साहयक मोटार वाहन निरीक्षक राख साहेब व साहयक मोटार वाहन निरीक्षक कलाले मॅडम व वाहन चालक अशोक टोमके यांनी त्या घुबडाला जिवदान दिले..
Discussion about this post