
(आर्णी महसुल विभाग व आर्णी पोलीस प्रशासन आणि पारवा पोलीस प्रशासन रेती तस्कऱ्यांच्या दावणीला)
श्री. रमेश राठोड सावळी सदोबा..
यवतमाळ आर्णी तालुक्यातील गौण खनिजाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावळी सदोबा परिसरातील चिमटा, दातोडी, खड्का, रत्नापूर राणी धानोरा सह या भागात प्रसिद्ध रेती घाट आहे. सध्या जिल्ह्यात कोणत्याच रेती घाटाचा लिलाव झालेला नसून, चिमटा रेतीघाट सध्या रेती तस्करासाठी खुले झाले की काय अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. दररोज संध्याकाळपासून रात्रभर व पहाटेपर्यंत शेकडो ट्रॅक्टर द्वारे नदीपात्रातून अवैध रेती काढून काठावर शेकडो ब्रास रेतीचा साठा करून ठेवला जात आहे, ही साठवणूक केलेली रेती रात्रीला 15 ते 16 टिप्परद्वारे यवतमाळ, वाशिम, मंगरुळपिर, वर्धा पांढरकवडा, तेलंगणाकडे पाठविली जात आहे. याकडे महसूल विभाग व पोलीस प्रशासन हेतू पुरस्सर दुर्लक्ष करीत
असल्याचे चित्र या दुर्गम परिसरामध्ये पाहायला मिळत आहे. चिमटा रेती घाटावरून दररोज दहा ते पंधरा टिप्पर अवैध रेती भरून जात आहे, अर्थात 90 ते 100 ब्रास रेती दररोज चोरी केली जात आहे, सावळी सदोबा परिसरामध्ये हा प्रकार मागील अनेक दिवसापासून अविरत सुरू असल्याने, आतापर्यंत हजारो ब्रास रेतीची चोरी झाली असल्याने शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल पाण्यात बुडाला
आहे. सुप्रसिद्ध चिमटा रेती घाटावर पैनगंगा व आडाण या दोन्हीही नदीचा संगम असल्याने, या रेती घाटात मोठ्या प्रमाणात रेती साचल्या जाते. या साचलेल्या रेतीची महसूल विभागाच्या नाकावर टिचून रेती तस्कराकडून मोठ्या प्रमाणात तस्करी केल्या जात आहे, झटपट पैसे कमावण्याचा मार्ग म्हणून रेती तस्कर या व्यवसायामध्ये इंटरेस्ट घेत आहे. अनेक राजकीय पांढरपेशी नेत्यांचा वास्तव असल्याने, रेती तस्करींचा हा व्यवसाय निरंतर सुरू राहावा यासाठी या परिसरातील रेती तस्करांची जबरदस्त फील्डिंग लावलेली आहेत. रेती तस्करांच्या आर्थिक हितसंबंधातून आर्णी महसूल विभाग आर्णी पोलीस स्टेशन व पारवा पोलीस विभागाचे काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संगणमताने रेती तस्करींचा गोरख धंदा परिसरामध्ये राजरोसपणे सुरु आहे. आर्णी महसूल विभाग व पारवा पोलीस प्रशासन जणू रेती तस्करांच्या दावणीलाच बांधलेले असल्याचे चित्र सध्या या परिसरात पाहायला मिळते. महसूल विभागाकडून रेती तस्करी करणाऱ्या तस्कराकडून पठाणी वसुलीसाठी विशेष अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली आहेत महसूल विभागाचा अधिकारी कोणत्या मार्गाने रेती घाटाकडे येत आहे याची माहिती त्यांच्याकडे असते याच भरोशावर टिप्पर बिनधास्त यवतमाळ वाशिम कडे पोहोचवतात..
Discussion about this post