या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळेचे मु.अ. श्री राठोड सर आणि प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सुलतानपूरचे ग्रामविकास अधिकारी श्री. मोरे सर हे होते.
सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. कोरडे सर यांनी केले. सदर कार्यक्रमात गावातील कर्तृत्ववान महिलांचा तसेच शाळेतील गुणवंत विद्यार्थिनींचाही पाहुण्याच्या हस्ते सत्कार व सन्मान करण्यात आला.
शिक्षणाने महिलांचे सबलीकरण होईल त्यासाठी त्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळवून दिली पाहिजे. महिलांच्या संरक्षणाची जबाबदारी संपूर्ण समाजाची असून त्यांच्या बाबतीत चांगले विचार व कृती समाजातून निर्माण झाली पाहिजे असे मत त्यांनी मांडले.
स्त्रीच्या रुपात कन्या, आई, बहीण, पत्नी, आजी, मैत्रीण, पहायला मिळते ती कोणत्याही रुपात असो तिचा आदर व सन्मान करायचे शिका असे मत अध्यक्षीय समारोपात राठोड सर यांनी मांडले श्री. बालाप्रसाद चव्हाण सर यांनी “एक कळी म्हणाली” ही स्त्री जीवनावर आधारित कविता सादर केली तसेच या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन केले तर आभार सोनवणे सर यांनी मानले.
तसेच शाळेचे सह.शि. कोरडे सर, कोकाटे सर,श्रीम. जगताप मॅडम श्रीम. पवार मॅडम, ग्रा.पं.प्र. अजित लोखंडे, कर्मचारी रामदास नावडकर, अंगणवाडी सेविका श्रीम. लोखंडे, श्रीम. जाधव, ज्योती नाईकनवरे, गावातील महिला, पालक व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
Discussion about this post