====================अशोक वस्तानी ( मुळशी )दिनांक 8 मार्च 2025 रोजी पुनवळे येथील रोझ अस्टर सोसायटी मध्ये अंतर राष्ट्रीय महिला दिन मोठ्या आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. या सोसायटीतील महिलांनी एकत्र येऊन विविध मनोरंजनाचे खेळ खेळून आपल्यातील प्रतिभेचे एक आगळे प्रदर्शन घडवले.
जेष्ठ महिला कार्यकर्त्यां संगिताताई भालेराव यांच्या मार्गदर्शना खाली त्यांचे सर्व सहकारी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. सोसायटीच्या क्लब हाऊस मध्ये सात आणि आठ तारखेला सायंकाळी हा कार्यक्रम आयोजित केला गेला.
या मध्ये सर्वांनी एकत्र येऊन आपल्या मधील सुप्त गुणांना वाव देणारे विविध खेळ खेळण्यात आले. वैयक्तिक आणि सांघिक अशा स्वरूपाच्या या खेळात सर्वांनी हिरीरीने सहभाग नोंदवून आपल्यातील गुण इतरांपुढे प्रकट केले.
प्रत्येक खेळानंतर यशस्वी खेळाडूंना प्रोत्साहनपर एकेक छोटे बक्षीस दिले जात होते. या उपक्रमात सौ. भालेराव यांना साथ देण्या साठी त्यांच्या सहकारी करुणा वस्तानी, मीनाक्षी कुलकर्णी, वर्षा हुगेवार,नंदा झुंजूनवाला, माधुरी कुडेकर इत्यादी या महिलांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमात या दिनाचे औचित्य साधून सोसायटी मधील स्वच्छतेची जबाबदारी सांभाळणाऱ्या हाऊस कीपिंग विभागतील सर्व महिला कर्मचाऱ्यांचा सोसायटीच्या वतीने सत्कार एकेक भेट वस्तू देऊन करण्यात आला. कार्यक्रमाचा शेवट गोड व्हावा, म्हणून केक कापून तो सर्वांना वाटण्यात आला.
कार्यक्रम संपताना सोसायटी मधील जेष्ठ कार्यकर्ते सतीश भालेराव, पत्रकार अशोक वस्तानी, गोविंदप्रसाद झुंजूनवाला, बबनराव पाटील, विनायक हुगेवार इत्यादी मंडळींनी या महिलांचा गौरव करून पुष्पगुछ, गुलाबाची फुले आणि भेटवस्तू देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
असा हा आगळा वेगळा कार्यक्रम या सोसायटी मध्ये प्रथमच सादर करून महिलांनी एक वेगळाच पायंडा पडला. याचे कौतुक आता या आणि इतर सोसायटी मध्ये सर्वत्र करण्यात येत आहे.
Discussion about this post